You are currently viewing झाराप येथे झिरो पॉईंट वर अपघात दोन मोटरसायकलची एकमेकांना धडक.

झाराप येथे झिरो पॉईंट वर अपघात दोन मोटरसायकलची एकमेकांना धडक.

झाराप येथे झिरो पॉईंट वर अपघात दोन मोटरसायकलची एकमेकांना धडक.

सावंतवाडी

झाराप येथे झिरो पॉईंट वर दोन मोटरसायकल एकमेकांना धडकून अपघात झाला त्या अपघातात तीन जण जखमी झाले. त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथील युवक साद शेख 23 तर बिहार येथील आकेरी येथे कामानिमित्ताने राहत असलेले सहमत अली 23 व राबुल अन्सारी 24 अशी त्यांची नावे आहेत.
दोन्ही युवकांची समोरासमोर मोटरसायकल एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातानंतर झाराप येथील सरपंच राजू तेंडुलकर यांनी त्या अपघात ग्रस्त तिन्ही युवकांना आपल्या फोर व्हीलर मध्ये घालून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांच्या डोक्याचे सिटीस्कॅन होऊन त्यांच्यावर अधिक उपचार सुरू आहेत.
यासाठी सावंतवाडी येतील जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मजूरकर व रवी जाधव यांच्याकडून अपघात ग्रस्त युवकांना योग्य ते सहकार्य करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा