You are currently viewing १० जानेवारी रोजी मोरगाव आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन

१० जानेवारी रोजी मोरगाव आरोग्य केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन

जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे आयोजन

दोडामार्ग :

शुक्रवार दिनांक १० जानेवारी रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव येथे सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान नाणिजधाम व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, शाखा दोडामार्ग यांच्या संयुक्त विद्यमामाने या शिबिराचे आयोजन केले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम यांच्या माध्यमातून ४ ते १९ जानेवारी हा रक्तदान महायज्ञ संकल्प महाराष्ट्र राज्यात सुरू असून त्या दृष्टीने दोडामार्ग तालुक्यात जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान दोडामार्ग शाखेच्यावतीने रक्तदान महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे.

सदर रक्तदान शिबिरास इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानचे दोडामार्ग प्रमुख सुभाष गवस 9764503688, रमिला बागकर 9422382093, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे दोडामार्ग सचिव संतोष सातार्डेकर 9403557705, उपाध्यक्ष सौ. गीतांजली संतोष सातार्डेकर 9421026075, भूषण सावंत 9309978684 यांना संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा