You are currently viewing डॉ. श्री. चंन्द्रकांत सावंत सर व परिवारांकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार साठी देणगीरूपात मदत

डॉ. श्री. चंन्द्रकांत सावंत सर व परिवारांकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार साठी देणगीरूपात मदत

डॉ. श्री. चंन्द्रकांत सावंत सर व परिवारांकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार साठी देणगीरूपात मदत*

*जीर्णोद्धार साठी देवस्थानाला मदत करण्याचे केले आवाहन*

सावंतवाडी

ओवळीये ता. सावंतवाडी येथील ग्रामदैवत श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार काम सुरु आहे. या कामासाठी देणगीदार व दात्यानी सहकार्य करावे असे आवाहन डॉ .श्री चंद्रकांत सावंत यांनी केले.

श्री देव गांगोबा जत्रोसव दिवशी भारतभूषण, राष्ट्रीय समाजसेवारत्न, जागतिक आदर्श शिक्षक, कोकणरत्न, कोकणभूषण, समाजगौरव, समाजभूषण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आठ मानद डॉक्टरेट व मानांकीत सन्मान प्राप्त डॉ. श्री. चंन्द्रकांत तुकाराम सावंत सर व श्रीकांत तुकाराम सावंत व परिवार यांच्याकडून श्री देव गांगोबा मंदिर जीर्णोद्धार कार्यासाठी १,२१,१२१/- ( एक लाख एकवीस हजार एकशे एकवीस रुपये ) देणगी रक्कम मा. श्री. चंद्रकांत विश्राम सावंत यांनी अध्यक्ष, मा. श्री. बाबुराव शिवराम सावंत ,खजिनदार यांच्याकडे चेक स्वरूपात सुपूर्द केली.यावेळी श्री. संतोष अनंत सावंत सचिव श्री. न्हानू सीताराम सावंत, श्री. महादेव शंकर सावंत, श्री. मोहन महादेव सावंत, श्री. प्रकाश आत्माराम सावंत, श्री.सदानंद गोविंद सावंत, श्री.महेश धोंडी सावंत तसेच मानकरी, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ ओवळीये , श्री. राजेश यशवंत गावडे , आणि भाविक भक्त उपस्थितीत होते.

उपस्थितांनी डॉ.सावंत व परिवाराच्या या सामाजिक समाजकार्या बद्धल आभार व्यक्त केले .

प्रतिक्रिया व्यक्त करा