You are currently viewing समूह नृत्य स्पर्धेत आरोंदा खेमराज सावंतवाडी तालुक्यातअव्वल

समूह नृत्य स्पर्धेत आरोंदा खेमराज सावंतवाडी तालुक्यातअव्वल

*समूह नृत्य स्पर्धेत आरोंदा खेमराज सावंतवाडी तालुक्यातअव्वल*.

*बांदा*

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत आयोजित सावंतवाडी तालुकास्तरीय शालेय बाल, कला,क्रीडा व ज्ञानी होणार महोत्सवात लहान गट समूह नृत्य स्पर्धा प्रकारात आरोंदा खेमराज शाळेने घवघवीत यश मिळवत सावंतवाडी तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवत जिल्हा स्तरावर सावंतवाडी तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.
बेटी बचाव या थीम अंतर्गत असलेला हा नृत्य प्रकार केंद्र ,प्रभाग व आता तालुकास्तरावरही प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
केवळ सहा पटसंख्या असलेल्या या शाळेने विद्यार्थी ,पालक व शिक्षकांच्या सहकार्याने हे यश संपादन केले आहे.
शाळेची पटसंख्या कमी असल्यामुळे इतर विद्यार्थी आजूबाजूच्या शाळेतून जमवून नृत्याची तयारी केली होती. त्यासाठी आरोंदा नं. १ शाळेचे मुख्याध्यापक गणपत गावडे , कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका यशस्वी तावडे ,आरोंदा मानसी शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पाटी तसेच तळवणे नं. ४ शाळेचे मुख्याध्यापक विनोद झेंडे तसेच पालकांनी खूप सहकार्य केले.सदर नृत्य बसवण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या शिक्षण तज्ञ श्रेयसी पावसकर आणि ईश्वरी कुडाळकर यांनी मेहनत घेतली.कमी पटसंख्या असूनही शाळेने इथपर्यंत मजल मारल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक संदीप निऊंगरे सहकारी शिक्षक भगवान पारधी व मुलांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांंचे गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, विस्तार अधिकारी प्रमोद पावसकर,आरोंदा केंद्राचे केंद्रप्रमुख लक्ष्मीदास ठाकूर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा तनुजा नाईक तसेच पालक व ग्रामस्थ यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा