You are currently viewing माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या प्रलंबित अडीअडचणी सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन

सिंधुदुर्गनगरी

 जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्याचारासंबंधीत व इतर प्रलंबित अडी अडचणी सोडविण्यासाठी पोलीस अधिक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कल्याण अधिकारी यांनी दिली आहे.

या बैठकीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता, वीरपिता यांच्या कुटुंबावरील अन्याय,अत्यांचार व त्यासंबंधित भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा आणि त्यांच्या निराकरण करण्यासाठी सिंधुदर्ग जिल्हा पोलीस प्रशासन व संबंधित माजी सैनिक यांच्यात सविस्तर विचार विनीमय करण्यात येणार आहे.

 तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ज्यांची जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सिंधुदुर्ग येथे नोंद आहे अशा सर्व माजी सैनिक, माजी सौनिक विधवा पत्नी, वीरनारी, वीरमाता व वीरपिता यांनी त्यांच्या कुटुंबावरील अन्याय, अत्यांचारविषयी पोलीस यंत्रणेसंदर्भातील काही समस्या व इतर काही प्रलंबित अडी अडचणी असल्यास सदर प्रकरणांचा लेखी अर्ज व सर्व कागदापत्रासह व त्याबाबत यापुर्वी केलेल्या पत्रव्यवहारासह 10 जानेवारी 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावेत.

या गठीत समितीची बैठक पुढील प्रत्येक महीन्याच्या 1 ते 10 तारखेदरम्यान होणार आहे. तरी त्यासंबंधीत काही तक्रारी असल्यास प्रत्येक महीन्याच्या 30 व 31 तारखेपर्यंत या कार्यालयात लेखी स्वरूपात सादर कराव्यात असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. ०२३६२-२२८८२०/ ९३२२०५१२८४ वर संपर्क करावा

प्रतिक्रिया व्यक्त करा