सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दोन भुलतज्ञ डॉक्टरांची नियुक्ती
जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांच्या प्रयत्नांना यश
सावंतवाडी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय इथे दोन भुलतज्ञ वेगवेगळ्या प्रत्येकी तीन दिवस यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये भूल तज्ञ म्हणून काम करायचे असून यासाठी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन देऊन मध्यंतरी मागणी केली होती. मध्यंतरी डॉक्टर श्रीमती देशपांडे हे सावंतवाडी मध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये भूल तज्ञ म्हणून अनेक महिने काम करत होते त्यांना व्यक्तिगत अडचणीमुळे व कामाचा ताण वाढल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. यामुळे रुग्णांची अडचण होऊ नये म्हणून गरोदर स्त्रिया दुर्गम भागातून रुग्ण येत असतात त्याचप्रमाणे अपेन्डिस हर्निया असे विविध प्रकारचे शस्त्रक्रिया जे सावंतवाडीमध्ये होत आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये 70 हजार हून सावंतवाडी रुग्णालयामध्ये औषधोपचार करून त्याचप्रमाणे आवश्यक असलेल्या रुग्णाचे शस्त्रक्रिया करून औषधोपचार करून रुग्णाला चांगली सेवा डॉक्टर देत होते. त्याला भूलतज्ञ नसल्याने असे काम थांबणार आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये असे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांना निवेदन दिले होते. यामुळे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर श्रीपाद पाटील यांनी दोन भूलतज्ञ आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस असे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले असून धन्यवाद दिले आहे. भूलतज्ञ मिळाल्यानंतर डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी आभार मानले आहे