*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*तुझे माझे म्हणून*
तुझे माझे
प्रत्येकाचे विचार भिन्न
नको खिन्न
व्हायला….
असते प्रत्येकाची
आवड वेगळी आपापली
जाणावी मनातली
समजून….
आदर करावा
वेगळ्या इतर छंदाचा
दृष्टीकोन कौतुकाचा
ठेवावा…
तुझे माझे
जरी असले तरी
समंजस विचारी
रहावे…
समजून घ्यावे
परस्परांचे वेगळे विचार
भावनेची किनार
जपावी….
तुझ्या माझ्यातही
एकच ठेवायचा आचार
तडजोडीचा विचार
सौख्यासाठी….
अरुणा दुद्दलवार @✍️