सावंतवाडी :
कारिवडे श्री येथील गवळदेवाचा वार्षिक जत्रोत्सव ८ जानेवारी रोजी होणार आहे. श्री गवळदेव देवस्थान नवसाला पावणारे असून गवळदेवाच्या वार्षिक उत्सवानिमित्त हजारो भाविक त्याचे दर्शन घेतात. यानिमित्त मंदिरात सकाळी ८ वा पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, आरती, त्यांनतर तीर्थप्रसाद व दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. सायंकाळी ७ वाजता ग्रामस्थांची रात्री १२ वाजता भजने, पार्सेकर दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गवळदेव देवस्थान ट्रस्टने केले आहे.