*पाटबंधारे विभागाच्या आडमुठेपणामुळे अपघात : विनिता घाडी यांचा आरोप*
*कुडासे भोमवाडी कालवा रस्त्यावर संरक्षक कठडे उभारण्यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र*
*दोडामार्ग
कुडासे भोमवाडी येथील कालव्याला संरक्षक कठडे नसल्याने अपघातात जीव जातं आहेत, मात्र वारंवार याकडे लक्ष वेधूनही पाटबंधारे विभाग याकडे नेहमीच डोळेझाक करतो,या पाटबंधारे विभाग तिराळी यांच्या दुर्लक्षामुळे १९ डिसेंबरला एक चारचाकी कालव्यात पडून एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला, मात्र त्यांनतरही सदर विभाग सुशेगाद आहे. या विषयी सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिलाआघाडी उप जिल्हाप्रमुख विनिता घाडी व दोडामार्ग तालुका महिला आघाडीच्या पदाधिकारी आक्रमक झाल्या असून त्यांनी यासंदर्भात कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग चराठे याना निवेदन देत कठडे उभारण्या विषयी योग्य ती कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
या निवेदनात म्हटले आहे की,सदर कुडासे भोमवाडी येथे ४० कुटुंब राहतात, त्याना ये – जा करण्यासाठी हाच कालव्याचा मार्ग आहे तसेच शाळकरी मुलही याचं मार्गाने ये जा करतात, या कालवा मार्गाला बाजूने संरक्षक कठडे नसल्याने हा मार्ग धोकादायक आहे, या अगोदरही या मार्गावर संरक्षक कठडे उभारण्यासाठी सौ. घाडी यांनी निवेदन दिले होते मात्र पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले, त्यामुळे आता तरी जागे होवून पुढील जीवितहानी टाळण्यासाठी संरक्षक कठडे उभारण्याचे आवाहन विनिता घाडी यांनी केले आहे. यावेळी विनिता घाडी यांसह जेनीफर लोबो व पक्षाच्या महिला आघाडीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.