You are currently viewing कुडाळातील प्रतिष्ठित व्यापारी हनुमान मीलचे मालक सूर्यकांत शिरसाट यांचे दुःखद निधन

कुडाळातील प्रतिष्ठित व्यापारी हनुमान मीलचे मालक सूर्यकांत शिरसाट यांचे दुःखद निधन

कुडाळातील प्रतिष्ठित व्यापारी हनुमान मीलचे मालक सूर्यकांत शिरसाट यांचे दुःखद निधन

कुडाळ

सूर्यकांत शांताराम शिरसाट (वय 74) यांचे हृदयविकारच्या तीव्र झटक्याने आज पहाटे निधन झाले. ‌ कुडाळ मधील हनुमान ऑइल मिल चे मालक प्रतिष्ठित व्यापारी ‌ म्हणून ते प्रसिद्ध होते.

त्यांच्या पत्नी सुप्रिया सूर्यकांत शिरसाट या न्यू इंग्लिश स्कूल आंबोली शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका आहेत. तसेच त्यांचे चिरंजीव दत्तप्रसाद सूर्यकांत शिरसाट हे IAS ऑफिसर ‌ म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत.

सूर्यकांत शिरसाट यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे, भाऊ, भावजया असा मोठा परिवार आहे.

सूर्यकांत शिरसाट यांचा अंत्यसंस्कार विधी त्यांचे राहते घर मारुती मंदिर कुडाळ येथून उद्या सकाळी 7 वाजता ‌ होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा