*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*माहेर*
माझं माहेर गोजिरं
हिरव्या रानी लपलेलं
दारी झाडं प्राजक्ताचं
पान फुले लडलेलं
घाट माथ्यातुन येते
पायंदळी पायवाट
दिसे चिमुकले घर
टेकडीजवळ थेट
माहेरच्या अंगणात
पडे मोगऱ्याचा सडा
रंग रांगोळी रेखीव
बाजुस पाण्याचा घडा
नाजुक जाईजुई
कमानीवर झोपल्या
झाडावर चिऊताई
खोप्या मध्ये पहुडल्या
आजी आजोबांचा असे
आशीर्वाद सोबतीला
ममतेची बाराखडी
पाठी त्यांच्या बोलायला
झाडावर सायंकाळी
भरे पाखरांची शाळा
गोठया मध्ये कपिलाई
गोंजारी वत्स बाळाला
माझी भाचरे गोजिरी
रानावनात खेळती
शिकण्याची लई गोडी
तालुक्याच्या गावी जाती
नको गाडी बंगला
सुख प्रेमात नाहते
माया ममतेचे झरे
इथं घरात मिळते
सायंकाळी कोनाड्यात
दिवा नित्य झळकतो
पाठीमागे रामरक्षा
आईच्या म्हणु लागतो
माहेराकडुन येते
चरवी दुधाची हाती
नांदु दे सुख संपदा
भावाला प्रहर आठी
*शीला पाटील. चांदवड.*