You are currently viewing आनंदाचे गमक

आनंदाचे गमक

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा साहित्य प्रेरणा कट्टा आजगावच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ.स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

अष्टाक्षरी काव्यरचना

*आनंदाचे गमक*

 

अंतरंगी तेवणारी

प्रकाशली आत्मज्योत

अंतरीक अनुभूती

वाहे आनंदाचा स्त्रोत…१

 

अंधारात शोधताना

उगवला शुक्रतारा

चांदण्यात धरा न्हाली

बावरला धुंद वारा…२

 

सोनसरी धावताना

धुक्यातुनी वाट हसे

लाजाळूंनी मिटताना

दवबिंदू त्यात फसे…३

 

पारिजात फुलताना

सडे हर्षाचे उन्मन

केशरात लपताना

घडे सुगंधी दर्शन…४

 

मधुगंध चाखताना

पंखुडीत अडकला

कळी खुलता भ्रमर

वाऱ्यावर धडकला…५

 

मनी आनंद वसावा

डोळ्यातूनी पाझरावा

बासुरीचा सुर जैसा

ओठातुनी ओघळावा…६

 

सौ. स्नेहा धोंडू नारिंगणेकर

शिरोडा सिंधुदुर्ग

७०६६९९८७९६

प्रतिक्रिया व्यक्त करा