*भाजपा किसान मोर्चा ची जिल्हास्तरीय सदस्यत्व नोंदणी अभियान कार्यशाळा संपन्न*
सिंधुदुर्ग
भारतीय जनता पार्टी सदस्यत्व नोंदणी कार्यशाळा किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीतर्फे संपन्न झाला.
या कार्यक्रमास अध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते व प्रदेश प्रवक्ते सन्माननीय श्री. माधवराव भंडारी व प्रदेश उपाध्यक्ष श्री.अतुल काळसेकर उपस्थित होते तसेच व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.प्रभाकर सावंत, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.भाई बांदकर, प्रभारी श्री.प्रसन्ना देसाई, प्रदेश सरचिटणीस श्री.राजन चिके, किसान मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री.उमेश सावंत व जिल्हा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील व श्री.महेश संसारे , सोशल मिडीयाचे श्रीकृष्ण परब उपस्थित होते.
प्रदेश प्रवक्ते श्री.माधवराव भंडारी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की भारतीय जनता पार्टी चे सदस्य होणे ही अभिमानास्पद बाब आहे . सदस्यत्व नोंदणी हे प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रगतिपुस्तक आहे, स्थानिक निवडणूका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका असतात त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांचे हे प्रगतिपुस्तक प्रभावी असायला हवे.
किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री.उमेश सावंत यांनी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांस त्याचे सदस्य नोंदणीचे टार्गेट स्पष्ट केले.
किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.भाई बांदकर यांनी जास्तीत जास्त व प्रभावी सदस्यत्व नोंदणी कशी करायची यावर सविस्तर मार्गदर्शन केले ते म्हणाले कि नुसती रेफरल लिंक पाठवून चालत नाही तर त्यासोबत कन्टेन्ट रायटिंग महत्वाचे ठरते.
या सदस्यत्व नोंदणीचे प्रात्यक्षिक सोशल मिडीयाचे श्री.श्रीकृष्ण उर्फ राजु परब यांनी केले, सोप्या पध्दतीने नोंदणी कशी करायची याची महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.महेश संसारे तसेच आभार प्रदर्शन श्री.गुरुनाथ पाटील यांनी केले व संयोजन श्री.प्रसाद भोजने व जिल्हा सरचिटणीस सौ.ज्योती देसाई यांचे होते.
यावेळी श्री.सूर्यकांत नाईक – जिल्हा चिटणीस किसान मोर्चा , श्री.महादेव सावंत मंडळ अध्यक्ष – ओरोस , श्री.वैभव शेणाई मंडळ अध्यक्ष – कुडाळ , श्री.शिशुपाल सावंत श्री.यशवंत पंडित – संयोजक – एफ. पी.ओ. श्री.संदीप देसाई जिल्हा कार्यकारणी सदस्य सौ.कीर्तिमंगल भगत उपाध्यक्ष किसान मोर्चा , श्री.प्रकाश राणे , श्री.आशांक ठाकूर , श्री.आनंद गावडे , गोसेवा आयोगाचे श्री.दिपक भगत , श्री.जयवंत परब , श्री.साजुराम नाईक , श्री.रमेश घोगळे , श्री.निलेश तेंडुलकर इत्यादी सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यातून किसान मोर्चाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.