*श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचा ढोल पथकासह ग्रंथदिंडीत सहभाग*
*ग्रिनिक वर्ल्ड बुक आणि लिम्का बुकमध्ये मध्ये नोंद*
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या 750 आणि आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या 745 व्या सप्तशतकोत्तर जन्म महोत्सवी वर्षानिमित्त शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आणि श्री ज्ञानेश्वर चरित्र समिती व श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आळंदी देवाची यांच्या सौजन्याने तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज साहित्य नगरी आणि जगद्गुरु तुकाराम महाराज व्यासपीठ, मोरया मंगल कार्यालय, आळंदी देवाची येथे आळंदीतील नागरिक बंधूभगिनी,विद्यार्थी ,शिक्षक ,पत्रकार, समाजसेवक, वारकरी, टाळकरी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, आणि महाराष्ट्रातील उज्जैनकर फाउंडेशनचे विविध जिल्ह्यातील पदाधिकारी, साहित्यिक, रसिकांच्या मोठ्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाले. या संमेलनाचे उद्घाटक सुप्रसिद्ध निवेदक तथा मुलाखत कार पुणे येथील सुधीर गाडगीळ यांच्या शुभ हस्ते संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्ष नाशिक येथील कवयित्री प्रा.सुमतीताई पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ.सुरेंद्र हेरकळ, मंडळाचे माजी सदस्य तथा साहित्यिक विलास सिंदगीकर विद्यमान सदस्य डॉ.राजेश गायकवाड संमेलनाचे संयोजक प्रकाश काळे, संमेलनाचे कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर, संमेलनाचे निमंत्रक रूपालीताई चिंचोलीकर, संमेलनाचे सहसंयोजक अजित वडगावकर, संमेलनाचे सहकार्यध्यक्ष रामचंद्र कुऱ्हाडे पाटील खामगाव येथील संमेलनाचे कार्याध्यक्ष, सहसंयोजक डॉ.ज्ञानेश्वर पाटील, उद्योजक विनोदभाऊ डीडवाणीया व संमेलनाचे मुख्य आयोजक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर, फाउंडेशनच्या कार्यकारणी खजिनदार सौ. संगीता उज्जैनकर मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रसंगी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ती संत मुक्ताई व जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रसंगी सर्व मान्यवरांचा फाउंडेशन तर्फे मानपत्र, स्मृतीचिन्ह, पुस्तक व विशेषांक भेट देऊन सत्कार करण्यात आला .याप्रसंगी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे 200 विद्यार्थ्यांनी ग्रंथ दिंडीमध्ये सहभाग नोंदवला .याप्रसंगी येथील शिक्षक विकास शिवले, प्रदीप काळे सर यांनी व सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे विठ्ठल, रुक्मिणी आदिशक्ती संत मुक्ताई, संत ज्ञानेश्वर, संत सोपान देव, संत निवृत्तीनाथ यांचे वेशभूषा केलेले विद्यार्थी आकर्षण ठरले. त्याचप्रमाणे आदिशक्ती संत मुक्ताई यांच्याकडून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांना 750 फूट लांब व 101 किलो वजनाची राखी सुद्धा बांधण्यात आली. जगातील सर्वात लांब व जाड असल्याने त्याची ग्रिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड व लिंमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. ही राखी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अध्यक्ष तथा एमआयटी संत ज्ञानेश्वर बी.एड .कॉलेजचे प्राचार्य तथा उज्जैनकर फाउंडेशनचे पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. सुरेंद्र हेरकळ सर व विद्यार्थ्यांनी तयार केली या राखीचे सुद्धा या संमेलनात विशेष आकर्षण ठरले. प्रसंगी संमेलनाच्या विशेषांकाचे व फाउंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच फाउंडेशनचे तापी पूर्णा राज्यस्तरीय इतर व साहित्य पुरस्कारांनी 31 मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांनी डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या कार्याचे कौतुक करून हे कार्य अधिकाधिक उंच भरारी घेवो अशी माऊली चरणी प्रार्थना केली. प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते या संमेलनाचे मुख्य आयोजक डॉ. शिवचरण उज्जैनकर व पत्नी सौ. संगिता उज्जैनकर यांचा शाल, मानपत्र, स्मृतिचिन्ह विशेषांक भेट देऊन सत्कार करण्यात आला. “ओळख श्री ज्ञानेश्वरी” या परीसंवादांमध्ये अध्यक्ष श्री प्रकाश काळे यांच्या अध्यक्षतेखाली व दुसरा परिसंवाद “ताटी उघडा ज्ञानेश्वरा “या विषयावरील दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली ठेंग महाराज यांच्या अध्यक्षते खाली व ज्ञानेश्वर पाटील व इतर मान्यवरांच्या सहभागाने परिसंवाद रंगले .त्यानंतर बोली भाषेतील सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये त्यांचे बुलढाणा जिल्हा सदस्य जादूगार डी. चंद्रकांत यांनी कटपुतली शो दाखवून उत्साह निर्माण केला. तसेच दिघी आळंदी येथील महिला मंडळांनी भजनाचा उत्कृष्ठ कार्यक्रम सादर केला. फाउंडेशनचे पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अभंग, पोवाडे, भक्ती गीत यांनी रंगत आणली. समारोपीय सत्रात फाउंडेशनचे राज्य सल्लागार अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक तुळशीराम बोबडे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ता तथा साहित्यिक छत्रपती संभाजी नगर येथील डॉ. शिवानंद भानुसे यांच्या प्रमूख उपस्थितीत समारोपीय सत्र सुध्दा संपन्न झाले.डॉ. भानुसे यांनी उज्जैनकर फाउंडेशनच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या उपक्रमाचे कौतुक केले व मी गेल्या पंधरा वर्षापासून उज्जैनकर परिवाराशी घरोब्याचेचे नाते जोडलेले असून शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. शिवचरण उज्जैनकर सर यांनी व त्यांच्या सौभाग्यवती सौ. संगीता उज्जैनकर यांनी महाराष्ट्र मध्ये असंख्य माणसं जोडलीत व ती टिकून ठेवलीत त्याचा मी साक्षीदार आहे याविषयी सुद्धा त्यांनी आपल्या खास वक्तृत्व शैलीत दोघांचे कौतुक करून अभिनंदन केले .त्यानंतर फाउंडेशनचे राज्य सल्लागार कळवा जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध कवी डॉ. सतीश सोळाकुरकर यांच्या अध्यक्षते खाली व सहसंयोजक अजित वडगावकर, सुप्रसिद्ध कवी गणेश आघाव व फाउंडेशनचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत राज्यभरातून आलेल्या येथील कवीं, कवयित्रींनी या कवी संमेलनामध्ये उस्फूर्त अध्यात्मिक कविता सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. प्रसंगी सर्वांचा प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व विशेषांक देऊन गौरव करण्यात आले. संमेलन यशस्वीतेसाठी उज्जैनकर फाउंडेशनच्या राज्य पदाधिकारी व सभासदांचे सहकार्य लाभले.