नावळे येथे उद्या भगवती मंदिरात त्रैवार्षिक गोंधळ
वैभववाडी
नावळे गावचे ग्रामदैवत देवी भगवती देवीचा त्रैवार्षिक गोंधळ मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. यावेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
तरी या त्रैवार्षिक गोंधळाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नावळे देवस्थान समिती व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.