You are currently viewing कविसंमेलन निवेदन

कविसंमेलन निवेदन

 

मराठी भाषेतील आद्य पत्रकार आणि समाजसुधारक *बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर* यांनी *”दर्पण”* हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले. त्यांच्याच प्रेरणेने राज्य सरकारी कर्मचारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी *”कर्मचारी टाइम्स”* ह्या मासिक नियतकालिकाची मुहूर्तमेढ १ फेब्रुवारी २०२३ रोजी केली. त्याच *भाऊसाहेब पठाण* यांचा वाढदिवस ७ जानेवारी रोजी असतो. हा दुग्धशर्करायोग साधण्यासाठी *”भारतीय पत्रकार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ”, “कर्मचारी टाइम्स”* आणि *”मराठी साहित्य व कला सेवा”* यांच्या संयुक्त विद्यमाने *”मराठी पत्रकार दिन विशेष कविसंमेलन”* आयोजित करण्यात आले आहे.

सदर कविसंमेलन *मंगळवार दिनांक ७ जानेवारी २०२५ रोजी दुपारी ३ ते ५ ह्या वेळात राज्य सरकारी कर्मचारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, ९, नवीन प्रशासन भवन, तळमजला, मादाम कामा मार्ग, मंत्रालयासमोर, मुंबई ४०००३२* येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रथम नावनोंदणी आणि कविता पाठवणार्‍या पहिल्या २० जणांना सादरीकरणाची संधी मिळेल. कविसंमेलनाच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी *गुरुदत्त दिनकर वाकदेकर ९९८७७४६७७६* यांच्याशी संपर्क साधू शकता. *(नावनोंदणी अनिवार्य आहे. अंतिम तारीख ६ जानेवारी २०२५ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत)*

*नोंद:-*

नावनोंदणी करणार्‍या कवींनी नवीन प्रशासन भवनच्या प्रवेशद्वारावर गेट पास खिडकी आहे, तिथे आपले आधार कार्ड दाखवून पास बनवून घ्यावा. दुपारी २ नंतर प्रवेश दिला जातो.

आयोजक,

*अशोक रामचंद्र शिंदे*

*कार्यकारी संपादक – कर्मचारी टाइम्स*

प्रतिक्रिया व्यक्त करा