सावंतवाडीच्या क्रेडाई सदस्यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट
सावंतवाडी
सावंतवाडी बांधकाम व्यवसायिक संघटना क्रेडाई सावंतवाडीच्या सदस्यांनी मस्य व बंदर विकास मंत्री श्री.नितेश राणे यांची त्यांच्या ओम् गणेश निवासस्थानी कणकवली येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी अध्यक्ष श्री.नीरज देसाई ,खजिनदार श्री.यशवंत नाईक ,श्री.प्रवीण परब,श्री.संजय सावंत,श्री.अजय गोंदावले आणि श्री.उदय नाईक आदी क्रेडाई सावंतवाडीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी सध्या जिल्ह्यातील सर्व बांधकाम व्यवसायिकाना भेडसावत असलेला ऑनलाइन परमिशन संदर्भातील अडचणी या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. तसेच सावंतवाडी शहरातील वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी व शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मागणी करण्यात आली.त्यासाठी मंत्री महोदयांनी जातीने लक्ष घालून आपण लवकरच हे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले.