*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री विद्या रानडे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सत्यमेव जयते*
॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰॰
आजूबाजूला असत्य फिरतय
चारी बाजूंनी त्यांनी मला घेरलंय
श्वास कोंडतेाय माझा
म्हणून मान वळवली
तोंड फिरवून दुसरीकडे बघितलं
पण ते अक्राळ- विक्राळ असत्य
माझ्यावर चालून येत आहे
सगळीकडून जखडून ठेवलंय
सत्याचा गळा घोटला जातोय
दांभिकतेनं सभ्यतेचा मुखवटा घातलाय
यातून बाहेर पडणं कठीण आहे
कोणी सांगाल का असत्याचा पराजय कसा करावा
त्या असत्याला सर्वांसमोर
कसं आणावं ?
असत्य तर साळसुदपणानं सगळीकडे वावरतय
सत्यमेव जयते कागदावरच राहील का ?
मला बाहेर पडता येणारच नाही का?
विद्या रानडे