You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन

कामकाजाची नागरिकांना देणार माहिती

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने ‘रेझिंग डे’ सप्ताहाच्या अनुषंगाने पोलिस दलाची व पोलिसांच्या कामकाजाची नागरिकांना माहिती होण्याकरिता ६ ते ८ जानेवारी या कालावधीत कणकवली, कुडाळ, सावंतवाडी येथे तीन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

६ जानेवारी रोजी कणकवली बसस्थानकाजवळ, ७ जानेवारी रोजी कुडाळ पोलिस ठाणे समोरील पटांगण, ८ जानेवारी रोजी जगन्नाथ भोसले उद्यान, सावंतवाडी येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ या कालावधीत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

या प्रदर्शनात श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, सायबर गुन्हे सुरक्षा, सागरी सुरक्षा, अग्निशस्त्रे, फॉरेन्सिक युनिट, महिला साहाय्य, वाहतूक नियमन व नियंत्रण, पोलिस दलाची रचना व कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात येणार आहे. या प्रदर्शनास जास्तीत जास्त नागरिक व विद्यार्थी यांनी भेट देऊन प्रदर्शनातून माहिती घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा