You are currently viewing कुडाळ येथे भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा

कुडाळ येथे भाजपा सदस्यत्व नोंदणी अभियानाचा मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा

कुडाळ :

महाराष्ट्र राज्यात भाजप पक्षाच्या सदस्यता नोंदणी महाअभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. कुडाळ तालुका भाजप सदस्य नोंदणीला मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी रविवारी येथील भाजप कार्यालयाला भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधत अभियानाचा आढावा घेतला.

यावेळी पदाधिकारी-कार्यकर्त्यानी श्री. राणे यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.भाजपच्या सदस्यता महाअभियानाला आजपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात दीड कोटी सदस्य संख्येचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.प्रत्येक बूथवर किमान ३०० सदस्य नोंदणी होणे अपेक्षित आहे.

कुडाळ तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सदस्य नोंदणी करायला सुरुवात करण्यात आली आहे. भाजप पदाधिकारी-कार्यकर्ते जोरात कामाला लागले असून जास्तीत-जास्त नोंदणी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कुडाळ मंडळसाठी २५ हजार नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या नोंदणीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी मत्स व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथील भाजप कार्यालयाला भेट दिली. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी बाबत माहिती दिली. तसेच जास्तीत- जास्त सभासद नोंदणी करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर प्रदेश सदस्य बंड्या सावंत, सरचिटणीस रणजीत देसाई, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा आरती पाटील, युवा मोर्चा रुपेश कानडे, पप्या तवटे, जिल्हा बँक संचालक प्रकाश मोर्ये, राजू राऊळ, भाजपा गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक निलेश परब, अँड राजीव कुडाळकर, नगरसेविका चांदणी कांबळी, माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, विनायक राणे, मोहन सावंत, चारुदत्त देसाई, निलेश तेंडुलकर, अभय परब रेवती राणे, साधना माडये, तेजस्विनी वैद्य, मुक्ती परब,रेखा कानेकर,अदिती सावंत आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा