मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
२०२५ सालामध्ये शिव उद्योग संघटनेच्या माध्यमातून हजारो रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, त्याच पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली दामू नगर, कांदिवली पूर्व येथे हेमलता नायडू महिला शाखाप्रमुख मागाठाणे शाखा क्रमांक २६ यांनी स्थानिक शाखाप्रमुख सचिन केळकर यांच्या सहकार्याने महिला मुक्तीदिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला मेळावा आयोजित केला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. महिला मेळाव्याचा उद्देश शाखाप्रमुख सचिन केळकर यांनी विषद करत मेळाव्याची सुरवात केली. महिला शाखाप्रमुख हेमलता नायडू यांनी महिला सक्षमीकरण करण्यासाठी शिव उद्योग संघटना कटिबध्द असल्याचे सांगितले. सहकार सेना मागाठाणे प्रमुख रुचिता भोसले यांनी महिलांनी उद्योग व रोजगार क्षेत्रात कार्यरत शिव उद्योग संघटनेच्या विविध उपक्रमांचा लाभ महिलांनी घेण्यासंबंधी आवाहन केले.
सदर मेळाव्यात शिव उद्योग संघटनेचे सरचिटणीस प्रकाश ओहळे यांनी शिव उद्योग संघटनेच्या कार्याची व भावी वाटचालीची तसेच शिव उद्योग संघटनेच्या माझा महाराष्ट्र या ई-कॉमर्स वेबसाईट आणि महिला सेवा गटा संदर्भात माहिती दिली.
तद्नंतर इंडी श्रेष्ठ शास्त्रम् आयुर्वेदिक हेयर ऑइल कंपनीचे व्यवस्थापक योगेंद्र नाविक यांनी कंपनीच्या उत्पादनाच्या विक्रीतून महिलांना होणारा फायदा याबद्दल मार्गदर्शन केले. नंतर स्टे फाईन मल्टीव्हेंचरचे संचालक सूरज कुंभार व मोहिनी पुजारी यांनी महिला आरोग्य व नारी प्रोटेक्ट हे कंपनीचे उत्पादन याबद्दल प्रात्यक्षिकासह माहिती दिली व विभागातील महिला कंपनीला जोडल्या गेल्यास त्यांना होणारा आर्थिक फायदा याबद्दल माहिती दिली. सदर मेळाव्याला अंदाजे अडीचशे होऊन जास्त महिला उपस्थित होत्या. अनेक महिलांनी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदविले.
सदर मेळाव्याला स्थानिक पदाधिकारी बापूराव चव्हाण, समन्वयक माधुरी समेळ, समन्वयक अर्चना वर्पे , कार्यालय प्रमुख सोनाली चतुर्वेदी , सर्व उपशाखा प्रमुख, गटप्रमुख व महिला बचत गट यांची विशेष उपस्थिती होती.