मुंबई :
भव्य किर्तन महोत्सव व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण , संगीत संत चरित्र कथा सोहळ्याचे प्रतिवर्षाप्रमाणे बुधवार दिनांक ८ ते १२ जानेवारी २०२५ या कालावधीत भांडुपगाव वारकरी संप्रदाय मंडळ, रजि. यांच्यावतीने आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने समस्त भाविक भक्तांना प.पू. सद्गुरु हरिभाऊ महाराज बोराटे ( बाबासाहेब आजरेकर- फड प्रमुख पंढरपूर) वै.प.पू. सद्गुरु तुकाराम एकनाथ काळे माऊली, सद्गुरु वै . प.पू. रामभाऊ महाराज डोंगळे यांच्या सोबत पारायण नेतृत्व व्यासपीठ चालक गुरूवर्य ह.भ.प. संतोष महाराज सावरटकर ( भागवताचार्य ) काकडा नेतृत्व ह.भ.प.शिवाजी महाराज मन्ने ,ह.भ.प. श्री.राम महाराज सावंत मुंबई, ह.भ.प. माऊली महाराज मांढरे (वाई, सातारा) यांचे कुपा आशीर्वाद लाभणार आहे .यावेळी संत कथा संगीत विशारद ह. भ.प. संतोष महाराज साबळे, अविनाश महाराज जाधव, किरण महाजन कदम, तुकाराम महाराज सणस किर्तनकार म्हणून ह. भ.प. कवीराज महाराज झांबरे, तुकाराम महाराज मुळीक, अभिमन्यू महाराज कदम, दिपक महाराज बादाडे प्रबोधनात्मक मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी कलश पुजन, दिप प्रज्वलन, वीणा पुजन, व्यासपीठ पुजन खासदार संजय राऊत, खासदार संजय दिना पाटील, आमदार सुनील राऊत, माजी नगरसेवक परशुराम कोपरकर, कामगार नेते भाऊ जगताप, सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल चाहू पाटील, माजी नगरसेविका सारिका मंगेश पवार, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, जेष्ठ शिवसैनिक विलास तुपे यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्ष ह.भ.प. विनोद माऊली शिंदे, सचिव दत्ताराम माऊली पालेकर खजिनदार राजेंद्र माऊली कणसे यांनी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी यांचा लाभ घ्यावा असे संयुक्तिक आवाहन केले आहे. या सोहळ्याचे विशेष आकर्षण ३६ मृदुगाच्या निनादात किर्तन सेवा सादर करण्यात येणार आहे.