भाजपला मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदारापर्यंत पोचून भाजपचा सदस्य करा
* मत्स्य उद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना केले आवाहन
*कणकवली तालुक्यातील जाणवली येथे भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा झाला शुभारंभ
*मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत अनेक नागरिकांनी स्वीकारले भाजप चे सदस्यत्व
कणकवली
जे भाजपचे मतदार आहेत. जे आपल्याला कायम मतदान करतात आणि विजय मिळवून देतात.त्या प्रत्येकाला भारतीय जनता पक्षाचे सदस्य करा. जेणेकरून भाजप पक्ष,त्यांचे विचार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देश आणि राज्याच्या हिताचे जे जे निर्णय घेत आहेत ते निर्णय पक्षाचा सदस्य म्हणून त्यांच्यापर्यंत थेटपणे पोहोचविता येतील. त्यामुळेच सर्वाधिक सदस्य नोंदणीच्या दृष्टिकोनातून काम करा. असे आवाहन मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानाचा जाणवली येथे शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते.
कणकवली तालुक्यातील जाणवली जिल्हा परिषद मतदार संघातून भाजपा सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवक जिल्हा अध्यक्ष संदीप मेस्त्री,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारणी सदस्य रंजन राणे, संदीप सावंत, माजी पंचायत समिती सदस्य सुशील सावंत, परशुराम झगडे,बूथ अध्यक्ष भगवान दळवी, कीर्तीकुमार राणे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समीर प्रभू गावकर, बबलू सावंत, जाणवली सरपंच अजित पवार, उपसरपंच किशोर राणे, सरपंच भाई आंबेलवकर, सुयोग माणगावकर,राजू हिर्लेकर, संतोष कारेकर, संजना कारेकर,मकरंद सावंत, प्रतीक सावंत,प्रशांत राणे,गणेश तांबे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री नितेश राणे म्हणाले,आज आपण भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणीची सुरुवात आपल्या या जाणवली गाव आणि या ग्रामीण भागातून करतोय.मी मुद्दामूनच या दोन्ही बूथ वर विधानसभेत मतदानाचे आकडे काय होते हे विचारून घेतले आहे. जेणेकरून आपल्या या दोन्ही बूथ मधून किती लोकांपर्यंत पोचू शकतो याची एकंदरीत जाणीव व्हावी. म्हणून मी आपल्याला विनंती करीन सगळीकडे फिरण्यापेक्षा आपले जे मतदार आहेत. ज्यांनी भाजपला बुथवर सहाशे – साडेसहाशे किंवा चारशे साडेचारशे पेक्षा जास्त मतदान दिले आहे. या जाणवली जिल्हा परिषद मध्ये आपण 2600 पेक्षा जास्त मताधिक्य घेतले आहे.ज्या ज्या वाडीतून मतदान मिळाले आहे.त्या मतदारांची नोंदणी तुम्ही केला तर कमी काळात किंवा कमी वेळात तुम्ही जास्त सभासद बनवाल .जे आपले मतदार आहेत हे आपले भारतीय जनता पक्षाचे सभासद झाले तर त्यांना पक्षाचे कार्य, पक्षाचे ध्येय धोरण, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री घेत असलेले निर्णय हे सर्व त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल. म्हणून या पद्धतीने काम करावे अशी अपेक्षा मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.