You are currently viewing कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजपा पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजपा पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान

कणकवलीत आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे भाजपा पक्षाच्यावतीने सदस्य नोंदणी अभियान

मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी साधला थेट संवाद

कणकवली :

शहरातील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे कणकवली शहर भाजपा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात आले. यावेळी अनेक नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपली सदस्य नोंदणी केली. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्यउद्योग व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी मंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते देखील काही नागरिकांची सदस्य नोंदणी करण्यात आली.

 

यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक मेघा गांगण, किशोर राणे, संजय कामतेकर, बाबू गायकवाड, गौतम खुडकर, बंडू गांगण, शिशिर परुळेकर, संदीप राणे, प्रशांत सावंत, भाजपा प्रसिद्धी प्रमुख बबलू सावंत, गौरव हर्णे, बाळा वराडकर, समीर प्रभुगावकर, महेश सावंत आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा