कित्येक महिने कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर लसीमुळे वातावरणातील भीती कमी होताना दिसत आहे. परिस्थिती पूर्वपदावर येत असताना चीनमध्ये आता आईस्क्रीममध्येही कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत. यातील ३९० डब्यांची विक्री करण्यात आली असून, खरेदी करणा-या नागरिकांचा शोध घेतला जात आहे.
उत्तर चीनमध्ये ही घटना घडली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची झोप उडाली असून, तातडीची पावले उचलण्यात आली आहेत. प्रशासनाने संबंधित आईस्क्रीम निर्माती कंपनी सील केली आहे. सध्या या कोरोना संक्रमित आईस्क्रीमचे फक्त ३९० डब्बेच तियानजिनमध्ये विकले गेले असल्याने सरकारने म्हटले आहे.