सिंधुदुर्ग :
पुष्पसेन सावंत कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने बारावी सायन्स २०२४- २५ च्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक क्षेत्रातील माहिती मिळावी यासाठी सिंधुदुर्गातील कॉलेजस् ना सदिच्छा भेट देऊन करिअर मार्गदर्शन करण्याचा उपक्रम करण्यात येत आहे. या उपक्रमाला सिंधुदुर्गातील कॉलेजेस् कडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व फार्मसी चे कर्मचारी मेहनत घेत आहेत. तसेच कॉलेजचे प्राचार्य श्री. डॉ. युवराज पांढरे, इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष मा. श्री. भूपत सेन सावंत यांचे या उपक्रमाला प्रोत्साहन मिळत आहे.