*दिवंगत पंतप्रधान डाॅ. मनमोहन सिंग यांना जिल्हा काँग्रेसची श्रद्धांजली.*
सिंधुदुर्ग
भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ज्ञ डाॅ. मनमोहन सिंग यांना सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या वेळी अनेक वक्तांनी डाॅ. मनमोहन सिंग यांनी देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान म्हणून केलेल्या कामाचा आणि भारताला जगातील एक महासत्ता म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. रोजगार हक्क कायदा, माहितीचा अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, भूमी अधिग्रहण कायदा, वन अधिकार कायदा, अन्न सुरक्षा कायदा, शेतकऱ्यांना कर्जमाफी,अणू उर्जा करार,अनेक जनसामान्यांचे गरीबांचे आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा डाॅ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत झाल्या. आपल्या देशातील सभ्य शांत आणि संयमी नेतृत्व ज्यांनी 1991ला आर्थिक अडचणीत असलेल्या आपल्या देशाला फक्त आर्थिक अडचणीतून बाहेरच काढले नाही तर आपल्या भारत देशाला जगात एका उंचीवर नेले. 2008 मध्ये संपूर्ण जगात मंदी असताना अमेरिका सारखे देश त्या मंदीत होरपळत असताना त्या जागतिक मंदीची झळ आपल्या देशाला बसू दिली नाही अशा महान नेत्याला देश मुकला. डाॅ.मनमोहन सिंग यांची कमी देशाला कायम जाणवत राहिल अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, विकासभाई सावंत, प्रदेश प्रतिनिधी अॅड. दिलीप नार्वेकर, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावडे,अनिल डेगवेकर, विजय प्रभू, मेघनाद धुरी, रवींद्र म्हापसेकर, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, विनायक मेस्त्री, सुशील राणे,प्रदिप मांजरेकर, महेंद्र सांगेलकर, दादामिया पाटणकर, जेम्स फर्नांडिस, विधाता सावंत, एकनाथ नाईक,पांडुरंग नाटेकर,विद्याप्रसाद बांदेकर,आय.वाय.शेख, आशिष काष्टे,अमोल सावंत,व्हि.के.सावंत, हेमंत माळकर,मधुकर लुडबे,प्रवीण मोरे, आनंद परूळेकर,अजिंक्य गावडे, अमिदी मेस्त्री,स्मिता वागळे, कृष्णा धाऊसकर,नंदकिशोर दळवी, संदेश कोयंडे, प्रमोद अणावकर इत्यादी उपस्थित होते.