*अँड.आरती पवार यांची सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नियुक्ती*
सिंधुदुर्ग
सन 2023 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेमधून सहाय्यक सरकारी अभियोक्ता महाराष्ट्र राज्य ( वर्ग 1) पदी अँड.आरती पवार यांची निवड झाली व त्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली.यापूर्वी अँड.आरती पवार यांनी सिंधुदुर्ग येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे कार्यालयात सहाय्यक लोक अभिरक्षक या पदी काम पाहिले आहे. व आता ते सिंधुदुर्ग जिल्हामध्ये सहाय्यक सरकारी अभियोक्ता म्हणून काम पाहणार आहेत .सहाय्यक सरकारी अभियोक्ता या परीक्षेसाठी अँड.आरती पवार यांनी अहोरात्र मेहनत घेतली व त्यामुळे त्या पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करण्यात यशस्वी झाल्या. सदर यशाचे श्रेय त्यांनी आपले आईवडील व मित्र परिवाराला दिले.सहाय्यक सरकारी अभियोक्ता या पदी अँड.आरती पवार यांची नियुक्ती झाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.