You are currently viewing भोपाळच्या राष्ट्रीय कला उत्सवात कोकणचे सुपुत्र चेतन गंगावणे यांची परीक्षक म्हणून निवड

भोपाळच्या राष्ट्रीय कला उत्सवात कोकणचे सुपुत्र चेतन गंगावणे यांची परीक्षक म्हणून निवड

कुडाळ :

भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवमध्ये कोकणचे सुपुत्र चेतन परशुराम गंगावणे यांची परीक्षक म्हणून निवड झाली आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांमधील प्रतिभा ओळखून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी शालेय शिक्षण व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली यांच्यामार्फत २०१५ – १६ पासून या कला उत्सवाचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यामध्ये कलाक्षेत्रात राज्यस्तरावर विशेष प्राविण्य प्राप्त केलेले विविध राज्यातील विद्यार्थी सहभागी होतात. यावर्षी भोपाळ मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवाचे परीक्षक होण्याचा बहुमान चेतन गंगावणे यांना मिळाला आहे.

चेतन गंगावणे यांनी ठाकर आदिवासी कला आंगणच्या माध्यमातून कोकणातील ठाकर आदिवासी कला जिवंत ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे. ही कला महाराष्ट्रासह देशभरात पोहचवण्यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहे.

त्यांच्या याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय कला उत्सवमध्ये त्यांची परीक्षकपदी निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशातून थिएटर, व्हिज्युअल आर्ट, संगीत, वाद्य, नृत्य अशा ५ विभागांसाठी ५ परीक्षकांची निवड झाली आहे ज्यामध्ये चेंतन गंगावणे यांचा समावेश आहे. त्यांच्या या निवडीमुळे सिंधुदुर्गसह कोकणच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवला गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा