*कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा*
मालवण :
वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, तालुका मालवण यांच्या वतीने कै. दादा ठाकूर (आचरे- पारवाडी) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय खुल्या (प्रौढ गट) वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा *रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता* जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.
*स्पर्धेचे विषय*
१) वाचन आहे प्रवास सुंदर.
२) भारताचे संविधान भारताचे
हृदय.
३) जनसेवा हीच खरी ईश्वर
सेवा.
४) अभिजात मराठी आणि
आमची कर्तव्ये.
५) ते अमर हुतात्मे झाले.
(कोणत्याही एका
क्रांतीकारकांविषयी विचार )
वरीलपैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरण करण्याची वेळ किमान ६ मिनिटे तर कमाल ८ मिनिटे आहे.
२ जानेवारी २०२५ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे
प्रथम क्रमांक – रू.२०००/- , द्वितीय क्रमांक रू. १५००/- तृतीय क्रमांक रू. १०००/- आणि स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम आलेल्या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल श्री.अमेय लेले, मोबाईल नंबर ९४२०६८४६१२ व उपग्रंथपाल श्री. विवेक जाधव, मोबाईल नंबर ९४२०७६३०१९ यांचे जवळ *२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत* द्यावीत. १५ स्पर्धक झाले की नोंदणी बंद केली जाईल. १० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग असल्यास उत्तेजनार्थ पाचशे रुपयाची दोन पारितोषिके व स्मृतिचिन्ह देण्यात येतील.
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष- श्री सुरेंद्र सिताराम सकपाळ , मोबाईल नंबर .९४२३३०१५८४, यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला प्रवेश अर्ज व्हाट्सॲप क्रमांकावर पी.डी.एफ. स्वरूपात पाठविण्यात येईल. तो भरून वेळेत पाठवावा, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र सकपाळ यांनी दिली आहे.