*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सावित्रीबाई फुले जयंती*
माझ्या सावित्री मायेनं
पेटवीली ज्ञानपणती
स्त्रियांच्या जीवनी तु
आदर्शाची क्रांतिज्योती
बा ज्योतिबाची तुचं
अर्धांगिनी सावली
आम्हा भगिनिंची झाली
जन्मोजन्मीची माऊली
शिकलीस अ आ इ ई
महिलांची मार्गदर्शिका
झेलुनी दगडमाती
झाली पहिली शिक्षिका
नाही कसलीच आस
नाही गर्व अभिमान
म्हणुन जगती या
तुज सावित्रीचा सन्मान
आई झाली अनाथांची
मायेचा घास भरवला
ऊब प्रेमाची देवुन
जगी सन्मान दिधला
सायंकाळी लागे दिवा
देवापाशी सांजवात
बाळाना ती शिकवते
रामरक्षा हरिपाठ
धन्य ज्योतिबाची किर्ती
धन्य सावित्रीची भक्ति
तुमच्या आदर्शाची आता
आम्हा मिळू देत शक्ति
**शीला पाटील. नाशिक*