*डॉ. शिवचरण उजैनकर फाउंडेशनचे सन्मा.सदस्य लेखक कवी मनोहर पवार केळवदकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*शिक्षणाचा मळा*
———————–
भिडे वाडयात वाडयात ।
केली सुरु शाळा ।
कसा फुलविला
फुलविला शिक्षणाचा मळा…… ॥ धृ॥
होती अति शुद्र नारी
अपमान घरी दारी ।
करी निर्धार निर्धार
लावी शिक्षणाचा लळा…..
कसा फुलविला
फुलविला शिक्षणाचा मळा॥ १॥
पहा फातिमा बीआली
चर्चा पुण्यात झाली
पहा कर्मठ कर्मठ
झाले सारे गोळा
भिडे वाड्यात वाड्यात पहिली
मुलींची शाळा॥२॥
जाता येता घाण
शिव्या ते बोलणं ।
त्या हातांनी धरूनी
लेखणी खडू फळा
भिडे वाड्यात वाडयात पहिली
मुलींची शाळा॥ ३॥
आली प्लेगाची साथ
मेले रोगाने कित्येक
नेले पाठीवर टाकूनि टाकूनी कनवळा
भिडे वाडयात वाड्यात देशात पहिली शाळा॥ ४॥
साथ होती ज्योतीबाची
आस साक्षरतेची
उठला पोटात पोटात
कर्मठांच्या गोळा ।
भिडे वाड्यात
वाड्यात कसा फुलविला फुलविला
शिक्षणाचा मळा॥ ५॥
————————–
मनोहर पवार केळवदकर, चिखली,
जिं . बुलढाणा .9850812651.