“मेड फाॅर नाॅट ओन्ली फाॅर यू, बट मेड फाॅर एव्हरीवन”…
जेष्ठ समाजवादी नेते ज्यानी स्व. एस्. एम्. जोशी, स्व. जाॅर्ज फर्नांडिस, स्व. नानासाहेब गोरे, स्व. नाना दंडवते अशा समाजवादी परिवारातील दिग्गजां बरोबर काम केलं ते स्व. नाना तारी यांचे सुपूञ श्री नंदू तारी यांनी सावंतवाडी शहरापासून साधारणपणे सोळा कि. मी. अंतरावर सोनुर्ली या गावात तब्बल बारा एकर मध्ये ग्रामीण पर्यटनाची आणि कृषी पर्यटनाची मुहूर्तमेढ रोवली. बेस्ट परिवहन सेवेतून निवृत्त झाल्यावर आपल्या जन्मभूमीत आणि श्री देवी माउलीच्या छञछायेखाली हा सुरु केलेला उपक्रम भविष्यात या जिल्ह्यातील पर्यटन चळवळीतील मैलाचा दगड ठरेल यात शंकाच नाही.
पाच वर्षापूर्वी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची माझी भेट झाली तेव्हापासून हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठीची तळमळ आणि धडपड मी पहात आहे. अर्थात कुटुंबियांची समर्थ साथ आणि माऊलीची कृपा यामुळे हा त्यांच्या स्वप्नातील ग्रामीण व कृषी पर्यटनाचा प्रकल्प साकारला… आणि अनेक पर्यटकांचे पाय आता या प्रकल्पाकडे वळू लागले.
शुटिंग रेंज, झीप लाईन, बैलगाडी, ट्रॅक्टर रायडिंग, सायकल आणि इतर अनेक साहसी खेळांच्या सुविधा असून, स्विमिंग पूल, नारळ, पोफळी, काजू आंब्याची लागवड सोबत अस्सल मालवणी मेजवानी.. बारा एकर मध्ये आकारलेला हा प्रकल्प त्या ठिकाणी मनस्वी आनंद लुटण्या बरोबरच मनाला शांती देणारे स्थळ आहे.
नवीन वर्षात याची नव्या दमाने व नव्या उर्जेने सुरूवात यासाठी त्यांनी मला विनंती केली आपण या उदघाटनाला यायच आहे आणि सोबत संस्थानचे युवराज लखमराजे याना पण आणायचे आहे. मी युवराजाना विनंती केली, अशा नवीन कल्पना राबवणाऱ्या कार्यक्रमाना ते कधीच नाही म्हणत नाहीत. त्यांनी तात्काळ होकार दिला आणि एक जानेवारीला नंदू तारी आणि कुटुंबियांच्या मेड फाॅर यू या पर्यटन प्रकल्पाचे उद्घाटन झाले. उदघाटनाला त्यांचे साडू आणि वेंगुर्ल्याच्या विकासाचे शिल्पकार माजी नगराध्यक्ष राजनजी गिरप,निवेदक व पञकार प्रा. रूपेश पाटील, पञकार अभिमन्यू लोंढे, श्री राजू तावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खरं तर हा पर्यटन प्रकल्प प्रत्येकासाठीच आहे.. त्यामुळे तो मेड फाॅर यू नसुन मेड फाॅर एव्हरीवन आहे.
नंदू तारी यांच्या या पर्यटन प्रकल्पाला मनापासून शुभेच्छा.
… शुभेच्छुक- अॅड. नकुल पार्सेकर
कार्यवाह, पर्यटन व्यवसायिक महासंघ, सिंधुदुर्ग.