You are currently viewing कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा

कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा

*कै.गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबकच्या वतीने खुली वक्तृत्व स्पर्धा*

सिंधुदुर्ग

वाचन कलाविकास समिती त्रिंबक संचलित कै. गाडगीळ गुरुजी मोफत वाचनालय, त्रिंबक, तालुका मालवण यांच्या वतीने कै. दादा ठाकूर (आचरे- पारवाडी ) यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिंधुदूर्ग जिल्हास्तरीय खुल्या
(प्रौढ गट) वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा *रविवार दिनांक ९ मार्च २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता* जनता विद्या मंदिर त्रिंबक प्रशालेच्या सभागृहात घेण्यात येणार आहे.
*स्पर्धेचे विषय*
१) वाचन आहे प्रवास सुंदर.
२) भारताचे संविधान भारताचे
हृदय.
३) जनसेवा हीच खरी ईश्वर
सेवा.
४) अभिजात मराठी आणि
आमची कर्तव्ये.
५) ते अमर हुतात्मे झाले.
(कोणत्याही एका
क्रांतीकारकांविषयी विचार )
वरीलपैकी कोणताही एक विषय स्पर्धकाने निवडावयाचा आहे. सादरीकरण करण्याची वेळ किमान ६ मिनिटे तर कमाल ८ मिनिटे आहे.
२ जानेवारी २०२५ पूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कोणताही स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे
प्रथम क्रमांक – रू.२०००/- , द्वितीय क्रमांक रू. १५००/- तृतीय क्रमांक रू. १०००/- आणि स्मृतीचिन्ह अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम आलेल्या १५ स्पर्धकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धकांनी आपली नावे ग्रंथपाल श्री.अमेय लेले, मोबाईल नंबर ९४२०६८४६१२ व उपग्रंथपाल श्री. विवेक जाधव, मोबाईल नंबर ९४२०७६३०१९ यांचे जवळ *२८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत* द्यावीत. १५ स्पर्धक झाले की नोंदणी बंद केली जाईल. १० पेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग असल्यास उत्तेजनार्थ पाचशे रुपयाची दोन पारितोषिके व स्मृतिचिन्ह देण्यात येतील.
सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहितीसाठी अध्यक्ष- श्री सुरेंद्र सिताराम सकपाळ , मोबाईल नंबर .९४२३३०१५८४, यांच्याशी संपर्क साधावा. त्यानंतर आपल्याला प्रवेश अर्ज व्हाट्सॲप क्रमांकावर पी.डी.एफ. स्वरूपात पाठविण्यात येईल. तो भरून वेळेत पाठवावा, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र सकपाळ यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा