*भडगाव बु.सह्याद्री माध्यमिक विद्यालयात उभारलेल्या प्रशस्त सभामंडपाचे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन*
*वैभव नाईक यांनी सभामंडपासाठी दिला होता १५ लाख रु. निधी*
कडावल पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे सह्याद्री माध्यमिक विद्यालय भडगाव बु . या विद्यालयासाठी माजी आमदार वैभव नाईक यांनी आपल्या आमदार फंडातून सभामंडप मंजूर केला होता. त्यासाठी १५ लाख रु. चा निधी देण्यात आला होता. याठिकाणी प्रशस्त असा सभामंडप उभारण्यात आला असून आज शुक्रवारी सभामंडपाचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाची सभामंडपाची गरज पूर्ण केल्याबद्दल वैभव नाईक यांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.
यावेळी संस्थाध्यक्ष चंद्रशेखर सावंत, उपाध्यक्ष जनार्दन चव्हाण, संस्था सचिव संभाजी वळंजू, मुख्यद्यापक सचिन धुरी, संदीप सावंत,चंद्रहास सावंत, वर्दे सरपंच महादेव पालव, लालू सावंत, अतुल कल्याणकर,अरुण माळकर,विद्याधर मुंज,अमित कल्याणकर,किरण गावकर,सहाय्यक शिक्षक सतीश वारंग,रामचंद्र पिकुळकर,माधुरी खराडे,सुप्रिया बांदेकर,आदिती परब,कविता राऊत, राजेंद्र सावंत, लक्ष्मण बावदाने, लक्ष्मण लोट,कु. भार्गव सावंत, कु. रेणुका खरात, कु. आर्या कल्याणकर यांसह संस्थेचे पदाधिकारी,पांग्रड शाळेचे मुख्याध्यापक, भडगाव बु. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.