You are currently viewing सावंतवाडीत 8 जानेवारी रोजी परीट समाजाची बैठक

सावंतवाडीत 8 जानेवारी रोजी परीट समाजाची बैठक

*सावंतवाडीत 8 जानेवारी रोजी परीट समाजाची बैठक*

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज व सावंतवाडी तालुका परीट समाज यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडीत बुधवार दि. 8 जानेवारी 2025 रोजी ठीक 4:00 वाजता श्रीराम वाचन मंदिरच्या हॉलमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परीट समाजातील जिल्हा पदाधिकाऱ्यांची व जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्षांची, तालुका सरचिटणीस तसेच सावंतवाडी तालुक्यातील सर्व परीट बांधवांची, पदाधिकाऱ्यांची व सर्व महिला भगिनींची बैठक लावण्यात आली आहे.
ही बैठक परीट समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष भाऊ कदम साहेब तसेच कोकण विभागीय अध्यक्ष नंदकिशोर राक्षे साहेब व रत्नागिरी जिल्हाध्यक्ष दीपक कदम साहेब, जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे.
नवीन जिल्हा कार्यकारणी गठीत करण्यासाठी तसेच 23 फेब्रुवारीला संत गाडगेबाबा जयंती व परीट समाज वधू-वर मेळावा करण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक लावण्यात आली आहे. तरी सावंतवाडी तालुक्यातील परीट बंधू -भगिनींनी, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका सरचिटणीस यांनी बैठकीला उपस्थित रहावे असे आवाहन परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, जिल्हा सरचिटणीस संजय होडावडेकर, तालुकाध्यक्ष राजू भालेकर व तालुका सरचिटणीस लक्ष्मण बांदेकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा