वैभववाडीत उद्या मंत्री नितेश राणे यांचा होणार नागरी सत्कार
वैभववाडी भाजपाचे आयोजन
वैभववाडी
महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांचा नागरी सत्कार शनिवार दि. ४ जानेवारी रोजी सकाळी ११ येथील भाजपा कार्यालय समोरील पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे. सत्काराची जय्यत तयारी पदाधिकारी यांच्याकडून करण्यात आली आहे.
या सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तरी तालुक्यातील विविध समाज संघटना पदाधिकारी, सामाजिक संघटना, भजन व क्रीडा मंडळे, बचत गट प्रतिनिधी, महायुतीतील सर्व घटक पक्ष, सरपंच, नगरसेवक, माजी सभापती, माजी नगराध्यक्ष, भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य, तालुका कार्यकारिणी सदस्य, चेअरमन, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष, पन्ना प्रमुख, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.