*खा.नारायण राणेंनी मनीष दळवी यांना दिल्या शुभेच्छा..!
कणकवली :
नव्या वर्षामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने ६०२५ कोटींच्या व्यवसायाचा टप्पा गाठून यशाचे नवीन शिखर गाठलेले आहे. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार नारायण राणे यांची आज कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर भेट घेतली. यावेळी नारायण राणे यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे बँक कामकाजाचे कौतुक करत बँकेने व्यवसायाचा ६००० कोटीचा टप्पा केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा ही दिल्या.
मागील डिसेंबर २०२४ अखेर संपलेल्या नऊ महिन्यामध्ये एकूण व्यवसायात ६३४ कोटींची वाढ झालेली असून मार्च २०२५ अखेर येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत बँक ३५०० कोटीचा वार्षिक ठेवींचा टप्पा निश्चित गाठेल असा विश्वास सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी व्यक्त केला आहे.
व्यवसायाचा हा टप्पा गाठण्यामध्ये बँकेच्या सर्व सभासद संस्था, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी महत्त्वाची भुमिका बजावली असून या वाटचालीमध्ये खासदार नारायण राणे, महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे, रवींद्र चव्हाण, निलेश राणे व बँकेच्या सर्व संचालक मंडळाने खंबीरपणे पाठबळ दिले आहे. बँकेची आर्थिक व तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तापुर्वक प्रगती होत असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या तीन जिल्हा बँकामध्ये या बँकेचा समावेश आहे. यापुढेही सिंधुदुर्गवासियांनी दाखवलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी याहीपेक्षा चांगले यश या पुढच्या काळामध्ये मिळवण्यासाठी जिल्हा बँक कटीबद्ध राहाणार आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक समीर सावंत, विठ्ठल देसाई ,सुरेश सावंत आदि मान्यवर उपस्थित होते.