सिंधुदुर्ग महाविद्यालयात राष्ट्रीय संगोष्ठी आणि महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या अधिवेशनाचे आयोजन
मालवण
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा हिंदी विभाग, महाराष्ट्र हिंदी परिषद तसेच महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १० व ११ जानेवारी रोजी दोन दिवसांची राष्ट्रीय संगोष्ठी व महाराष्ट्र हिंदी परिषदेचे ३१ वे अधिवेशन संपन्न होणार आहे.
या अधिवेशनासाठी संपूर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील प्राध्यापक उपस्थित राहणार असून “हिंदी नाट्य साहित्य विविध परिदृश्य” या विषयावर केंद्रित असणाऱ्या या संगोष्ठीमध्ये ५० हून अधिक संशोधकांचे संशोधन लेख सादर होणार आहेत. या लेखांवरती या चर्चासत्रामध्ये दोन दिवस साधक-बाधक चर्चा होणार आहे.
या संगोष्ठीसाठी उद्घाटक म्हणून शिवाजी विद्यापीठाचे माजी हिंदी विभाग प्रमुख प्रो डॉ.पी.एस.पाटील, बीजभाषक म्हणून डॉ.सतीश पांडे, स्वागताध्यक्ष म्हणून बाळासाहेब पंतवालावलकर प्रमुख अतिथी म्हणून चंद्रशेखर कुशे तसेच संगोष्ठी चे कार्याध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस ए ठाकूर उपस्थित असणार आहेत या संगोष्ठी चे संयोजक हिंदी विभाग प्रमुख प्रा.डॉ.हंबीरराव चौगुले असणार असून महाराष्ट्र हिंदी परिषदेचे सर्व पदाधिकारी या संगोष्ठी मध्ये उपस्थित राहणार आहेत. सर्व नाट्यप्रेमी तसेच हिंदी प्रेमींनी या संगोष्ठी साठी उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक डॉ.हंबीरराव चौगले यांनी केले आहे.