जळगाव :
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावने प्रथम वर्ष कला (FYBA) च्या द्वितीय सत्रासाठी डॉ. शैलजा करोडे यांची कविता “खिडकीतील आभाळ” चा “खान्देश काव्यप्रबोध” मधून अभ्यासक्रमात (syllabus) समावेश केला आहे. कवयित्री डॉक्टर शैलाजा करोडे यांनी याविषयी बोलताना असे सांगितले की, ही माझ्यासाठी मनस्वी आनंददायी घटना असून मी आरंभलेल्या काव्य शारदेच्या पूजेतील पहिलं फूल काव्यशारदेच्या चरणी पडलं याचं समाधान आहे. समाजाने मला काय दिलं? यापेक्षा मी समाजाला काय दिलं? हे महत्त्वाचं”.
जीवनमूल्ये असलेली डॉ.शैलजा करोडे यांची ही कविता विद्यापीठाने स्विकारली असल्याने नक्कीच भावी पिढीला त्याचा फायदा होणार आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने डॉ.शैलजा करोडे यांची कविता स्वीकारल्याने त्यांनी मराठी अभ्यास मंडळ व निवड समितीच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानले आहेत.