You are currently viewing नवचैतन्य

नवचैतन्य

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा लालित्य नक्षत्रवेल समूहाच्या सन्मा. सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती महाजन रायबागकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*नवचैतन्य*

 

आयुष्याच्या कॅनव्हासवरील

दुःखाचे फिक्के रंग पुसून

चित्र बनवूया तजेलदार

चमकदार नवे रंग भरून

 

नकोच सादर शोकांतिका

आयुष्याच्या रंगमंचाहून

सुखांतिकेचा प्रयोग करूया

मळभ सारे दूर सारून

 

कणस्वर सारे करूनी वर्ज्य

आयुष्याच्या मैफिलीतून

सुरेल, स्वर्गीय गीत गाऊया

मधूर सुरावट झंकारून

 

उचंबळती ऊंच ऊंच लाटा

मनाच्या अथांग दर्यातून

सौख्यनावेवर स्वार होऊया

तळाशी दु:ख बोचरे दडपून

 

उत्पत्ती, स्थिती, विनाश

कालचक्राच्या फेऱ्यातून

सलत्या आठवणींची पानगळ

नवचैतन्य पालवीच्या बहरातून

 

@भारती महाजन-रायबागकर

चेन्नई

©®या कवितेचे सर्व हक्क लेखिकेच्या स्वाधीन आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा