You are currently viewing आजची सावित्री

आजची सावित्री

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम शिरोमणी काव्य*

 

*आजची सावित्री*

 

सावित्री

स्रियांची प्रेरणा

जगण्यास दिले बळ

जाणून अंतरीची तिच्या वेदना…

 

सावित्री

किती सोसले

विरोधकांनी दिलेले घाव

प्रबळ इच्छाशक्तीने सहज झेलले…

 

सावित्री

ज्योतिबाची सावली

एकमेकांचा आधार सेवाधर्म

प्रगतीची ज्योतीर्मय वाट दाखवली….

 

सावित्री

आजची उच्चशिक्षित

अंगी पुरेपूर निर्णयक्षमता

शिक्षण विचाराने घडवले संचित….

 

सावित्री

बाणेदार तडफदार

अन्याय सोसत नाही

बुध्दीमत्तेवर आहे तिची मदार…

 

सावित्री

नाहीच उणी

प्रसंगी प्रेमळ कठोर

गौरवाची गाथा लिहिते लेखणी…..।।

 

 

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा