You are currently viewing बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित”

बांधकाम कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने पुकारलेले आंदोलन “स्थगित”

कामगार अधिकाऱ्यांनी तीस दिवसांत ८०% प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्याच्या शब्दांनंतर कृती समितीकडून आंदोलन स्थगितीचा निर्णय

 

अध्यक्ष प्रसाद गावडेंची माहिती

 

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कामगारांचे ६३२१ लाभाचे प्रस्ताव, १०४२३  नोंदणी व ७६० नूतनीकरण अर्ज मंजुरी अभावी प्रलंबित असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समितीने जिल्हा सुविधा केंद्रात ३ जानेवारीला आंदोलनाचा इशारा दिला होता. माहे फेब्रुवारी २०२४ पासून कामगारांचे शिष्यवृत्ती वा इतर लाभांचे प्रस्ताव कामगार कार्यालयाकडून पडताळणी न झाल्याने कामगार लाभांपासून वंचिर राहिले होते. जबाबदार अधिकारी व कर्मचारी वर्ग पुरेसे मनुष्यबळ नसल्याचे कारण देत वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप कृती समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडेंनी पत्राद्वारे करत आंदोलनाचा इशारा देताच नूतन सरकारी कामगार अधिकारी श्री किशोर जाधव यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावून पुढील तीस दिवसांत प्रलंबित पैकी ८०% प्रस्ताव अर्ज निकाली काढण्याची लेखी हमी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष प्रसाद गावडेंनी प्रसिद्धीस दिली आहे. या बैठकीस समिती अध्यक्ष प्रसाद गावडे, अशोक बावलेकर, प्राजक्त चव्हाण, प्रकाश दळवी, नूतन कामगार अधिकारी किशोर जाधव व दुकाने निरीक्षक रविराज हुंबे उपस्थित होते.येत्या काळात नूतन कामगार अधिकारी श्री जाधव दिलेला शब्द पाळून कामगारांना दिलासा देणार आहेत का हे पाहणे औत्युक्याचे ठरणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा