You are currently viewing वायगणंतड येथील अपघातात युवक गंभीर

वायगणंतड येथील अपघातात युवक गंभीर

*वायगणंतड येथील अपघातात युवक गंभीर*

*घोटगेवाडी येथील युवक : दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने अपघात*

*दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात नव वर्षाचे सुरु झालेले आपघाताचे सत्र संपता संपत नसून सलग तीन अपघाता नंतर आज वायगणतड येथे दुचाकीचा स्वय अपघात झाला यात दुचाकी स्वार प्रितेश कुडव हा गंभीर जखमी झाला. त्याला साटेली भेडशी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोमेकोत हल्यवण्यात आले.

दोडामार्ग येथे काल नववर्षाच्या संधेला अपघात घडला होता, त्यांनतर तिराळी घाटात पर्यंटकाच्या कारला अपघात घडला तर आज पुन्हा संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान प्रितेश कुडव हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन जातं असताना वायगणतड येथे आला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले व दुचाकी गटारात जावून पडली यामुळे दुचाकी स्वार जखमी झाला, त्याला साटेली भेडशी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांनतर अधिक उपचारसाठी त्याला गोवा मेडिकल कॉलेज येथे हलवण्यात आले, याबाबत अधिक तपास दोडामार्ग पोलीस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा