You are currently viewing श्री एकमुखी दत्तमंदिर सबनीसवाडा सावंतवाडी येथे ०४ जानेवारी रोजी श्री.टेंबेस्वामी महाराज प्रस्थान दिन सोहळ्याचे आयोजन

श्री एकमुखी दत्तमंदिर सबनीसवाडा सावंतवाडी येथे ०४ जानेवारी रोजी श्री.टेंबेस्वामी महाराज प्रस्थान दिन सोहळ्याचे आयोजन

*श्री एकमुखी दत्तमंदिर सबनीसवाडा सावंतवाडी येथे ०४ जानेवारी रोजी श्री.टेंबेस्वामी महाराज प्रस्थान दिन सोहळ्याचे आयोजन*

सावंतवाडी

श्री एकमुखी दत्त मंदिर व वासुदेवानंद सरस्वती मंदिर सबनीसवाडा सावंतवाडी येथे पौष शुद्ध ५ शनिवार दिनांक ०४ जानेवारी २०२५ रोजी श्री टेंबेस्वामी प्रस्थान दिन साजरा करण्यात येणार असून सकाळी ०७.०० वाजलेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सदर कार्यक्रमास भक्तगणांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन, आशीर्वाद घ्यावेत असे आवाहन श्री एकमुखी दत्तमंदिर व श्री वासुदेवानंद सरस्वती मंदिर स्थानिक उपसमिती यांनी केले आहे.
यावेळी खालील प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळीं ७.०० ते १२.०० श्री दत्त पुजा, अभिषेक व एकादशमी. श्री टेंबे स्वामी मंदिर येथील पादुकांवर अभिषेक पूजा. दुपारी १२.३० वाजता महाआरती. दुपारी ०१.०० ते ०३.०० वाजता महाप्रसाद. सायंकाळी ४.०० पासून तीर्थप्रसाद. सायंकाळीं ७.०० वा. नामस्मरण व आरती. सायंकाळी ७.४५ वा. टेंबेस्वामी महाराज पालखी सोहळा. रात्री ८.३० श्री हनुमान भजन मंडळ सालईवाडा यांचे भजन आयोजित केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा