देवगड येथील युवक तुतारी एक्सप्रेस मधुन पहाटे खाली कोसळल्यामुळे गंभीर जखमी…
देवगड
तुतारी एक्सप्रेस मधुन प्रवास करत असताना थेट खाली कोसळल्यामुळे देवगड येथील युवक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज पहाटे रोहा ते कोलाड प्रवासा दरम्यान घडली. ओंकार राऊत (वय २४) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या समवेत प्रवास करीत असलेल्या मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती दिली. त्यांनी त्या ठिकाणी तात्काळ धाव घेत जखमी ओंकार याला अधिक उपचार साठी रूग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात तो थेट रेल्वे रुळावर खडीवर कोसळल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर अधिक उपचार सुरू आहेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.