*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री भारती वाघमारे लिखित अप्रतिम काव्यरचना*
*वर्षा अखेरचा दिवस*
बघता बघता 2024 साल सरून गेले.
सुखदुःखाच्या हिंदोळ्यात आठवणीने भरून गेले.
चांगल्या आठवणी देऊन गेले.
वाईट आठवणी घेऊन गेले .
जुन्या आठवणींचा उजाळा मात्र देऊन गेले.
जाता जाता खूप काही शिकवून गेले.
लांब जाण्यासाठी चार पावले मागे चालवतं .
पुन्हा उगवण्यासाठी सूर्याला सुद्धा मावळावं लागतं .
सरून गेलेले वर्षे खूप काही शिकवून गेले .
आपले कोण परके कोण आरशासारखे दाखवून गेले.
कोणत्याही परिस्थितीत जगायचं कसं शिकून गेलं .
जगता जगता लढायचं कसं हे मनाला मात्र सांगून गेलं.
चुकले असेल काही मोठ्या मनाने माफ करावे .
चांगले ते वाटून घ्यावे वाईट सारे सोडून द्यावे.
सुखदुःखाच्या काळात तुमची मोलाची साथ मिळाली याबद्दल तुमचे खूप खूप आभार .
प्रेम सहकार्य लाभो आम्हाला एवढीच अपेक्षा आमची. आपुलकीची जपू नाती आमची आणि तुमची.
सौ भारती वाघमारे
मंचर