दोडामार्ग गोवा सीमेजवळ तेहेरी अपघात
दुचाकी स्वार गंभीर ; वाहनांचे मोठे नुकसान
दोडामार्ग
दोडामार्ग गोवा सीमेवर दोडामार्ग हद्दीत बुधवारी रात्री एक खाजगी बस प्रवासी उतरत असताना बाजूने दोन स्कुटर चालक मार्ग काढून पुढे येत असताना एक टाटा पिकप सुसाट वेगाने चुकिच्या मार्गाने येऊन दोन स्कुटर चालकाना जोरदार धडक देवून फरफटत नेले यामुळे दोन्ही स्कुटर बस मध्ये सापडले यात दोन्ही स्कुटर वर असलेले तरूण यात सापडून झालेल्या अपघातात मणेरी, इब्रामपूर येथील दोन जण गंभीर जखमी झाले. यात इब्रामपूर येथील युवक महेश इब्रामपूरकर याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली यामुळे बांबोळी गोवा येथे पाठवले. तर मणेरी पोलीस पाटील राजाराम कांबळे याच्या तोंडाला मार लागला दोडामार्ग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या विचित्र अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाली. टाटा पिकप हा मद्यपान केलेला होता. दोडामार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. दोडामार्ग गोवा चेकपोस्ट चीकूचे झाड येथे हा अपघात घडला.
म्हापसा ते दोडामार्ग इब्रामपूर अशी प्रवासी वाहतूक करणारी खाजगी बस दोडामार्ग गोवा सीमेवर चेकपोस्ट चीकूचे झाड येथे प्रवासी उतरण्यासाठी उभी केली होती. तेव्हा गोवा येथून कामावरून घरी येणारे दोन्ही स्कुटर तरुण बसला बाजू घेऊन पुढे येत असताना विरूद्ध दिशेने चूकीच्या बाजूने आलेल्या टाटा मोटर्स पिकप गाडीने दोन्ही स्कुटर धारकांना जोरदार धडक देऊन फरफटत उभ्या असलेल्या बसजवळ स्कुटरना नेले टेम्पो पिकप बस मध्ये दोन्ही स्कुटर सापडून स्कुटर बसच्या खाली जाऊन चक्काचूर झाला यात दोन्ही स्कुटर चालक जखमी झाले.
स्थानिक नागरीकांनी धावपळ करत आरडाओरडा करत टाटा पिकप मागे घेऊन जखमींना दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले तर पळून गेलेल्या टाटा पिकप चालकाला दोडामार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. अपघात झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहने अडकून पडली. दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहनाना मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली. दोडामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. इब्रामपूर येथील युवक महेश इब्रामपूर हा गंभीर जखमी आहे. डोक्याला डोळ्याला दुखापत झाली आहे. घटनास्थळी तसेच दोडामार्ग रूग्णालयात देखील मणेरी दोडामार्ग येत नागरीकांनी गर्दी केली होती. नववर्षाच्या पहिल्या दिवशी दोडामार्ग गोवा सीमेवर हा अपघात घडला.