You are currently viewing माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी दिल्या ‘राणे’ पिता-पुत्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी दिल्या ‘राणे’ पिता-पुत्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी दिल्या ‘राणे’ पिता-पुत्रांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुंबई :

आज राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या आदिष, जुहू मुंबई येथील निवासस्थानी भेट घेतली व दोन्ही मान्यवरांना २०२५ नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. या भेटीत प्रवीण भोंसले यांनी सावंवाडीतील मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी लवकर कार्यरत होण्याबाबत खासदार नारायण राणे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी विनंती केली. तसेच दोडामार्ग येथील MIDC येथे आणखीन जमीन घेऊन तेथे हॉस्पिटलसाठी लागणारी मशिनरी निर्माण करण्याचा प्रकल्प उभा करुन सिंधुदुर्गातील हजारों तरुणांना नोकऱ्या मिळतील, असा विश्र्वास खा. नराण राणे यांनी व्यक्त केला. यावेळी सतीश शेठ सुराणा व संतोष कोठारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा