You are currently viewing ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

ई आर 1  विवरणपत्र 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाचे मनुष्यबळाचे डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीचे ई आर 1 हे विवरणपत्र 31 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने भरण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त इनुजा शेख यांनी केले आहे.

            सेवायोजन कार्यालये (रिक्त पदे अधिसूचित करण्याची सक्ती करणारा) कायदा 1959 अन्वये कलम 5 मधील तरतुदीनुसार शासकीय/ निमशासकीय/ खासगी आस्थापनेत काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या माहितीचे तिमाही विवरणपत्र ई आर 1 प्रत्येक तिमाही संपल्यावर 30 दिवसाचे आत सादर करणे आस्थापनेस बंधनकार आहे. त्यासाठी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने विकसित केलेल्या  https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने भरावे.  ज्या उद्योजक/आस्थापना यांना ऑनलाईनव्दारे विवरणपत्र भरण्यास अडचणी येत असतील तर सहाय्यक आयुक्त कार्यालयाचा दूरध्वनी क्र.02362 228835 वर संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा